बीडमध्ये गाईच्या वासराला खाल्ल्यानंतर चक्क बिबट्याचा मृत्यू!  SaamTvNews
महाराष्ट्र

बीडमध्ये गाईच्या वासराला खाल्ल्यानंतर चक्क बिबट्याचा मृत्यू!

विनोद जिरे

बीड : बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचा प्रकार समोर आलाय. गेवराई तालुक्यातील माळस पिंपळा आणि राक्षसभुवनच्या शिवारात, एका बिबट्याने, शेतकऱ्याच्या गाईच्या वासराला भक्ष्य करत ठार केलं. मात्र, त्यांनतर बिबट्याचाही (Leopard) मृत्यू झालाय. गेवराई (Georai) तालुक्यातील राक्षसभुवन येथील शेतकरी, सुरेश लक्ष्मण नाटकर हे तीन दिवसांपूर्वी आपले जनावरे घेऊन शिवारात चारण्यासाठी गेले होते.

हे देखील पहा :

या दरम्यान त्यांच्या गाईचं वासरू अज्ञात हिंस्र पशूने खाल्ल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. मात्र त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आज बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडालीय. घटनास्थळावर गेवराई पोलिसांसह स्थानिक तलाठी आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले असून घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा करत आहेत.

दरम्यान या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्या सोबत इतर काही बिबट्यांचा वावर देखील या परिसरात असू शकतो. त्यामुळे वनविभागाने परिसराची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT