VIDEO  अभिजीत सोणावने, नाशिक
महाराष्ट्र

VIDEO : नाशिकमध्ये मानवी वस्तीत बिबट्याने पिल्लाचा पाडला फडशा; भयभित करणारी दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नाशिकच्या इगतपुरीमध्ये काल बिबट्या शिकार करताना दिसला.

साम वृत्तसंथा

Nashik News : जंगलांचे प्रमाण कमी होत चालल्याने अनेक ठिकाणी माणवी वस्तीत बिबट्या, वाघ असे हिंस्र प्राणी शिरकाव करताना दिसत आहेत.अलिकडे मानवी वस्तीत बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढला आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये काल बिबट्या शिकार करताना दिसला. त्याचा व्हिडीओ तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घटली इगतपूरी शहरातील गिरणारे परिसरात बिबट्याने (Leopard) कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केला. प्रकाश इलक यांच्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यावेळी कुत्र्याचे पिल्लू प्रकाश इलक यांच्या अंगणात झोपले होते. बिबट्याने शांतता असल्याचा अंदाज घेत पिल्लाला आपले भक्ष बनवले. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर फार वाहतूक नव्हती.

मात्र ही दृश्य सीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. यात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला तेव्हा एका दुचाकीवरून दोन व्यक्ती जात होत्या. बिबट्याला पळताना पाहून तेही पुरते भयभीत झाले. याच परिसरात दोन दिवस आधी बिबट्याने नकुळ दुभाषे यांच्या पाळीव कुत्र्याचा (Dog) फडशा पाडला होता. त्यामुळे गिरनारे गावातील ग्रामस्त भयभीत झाले आहेत. या गावचे नगरसेवक आणि परिसरातील नागरिकांनी वनविभागाला पिंजरा लाऊन बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे धान उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा

भाजपच्या माजी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षाचे निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

Hair Loss: केसांना तेल लावताना 'या' चुका करू नका; नाहीतर वाढू शकतो हेअर फॉल

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT