laxman hake : Saam tv
महाराष्ट्र

laxman hake : मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर समाधानी नाही; ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले?

laxman hake on obc reservation News : लक्ष्मण हाके यांना उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर समाधानी नसल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

Vishal Gangurde

अक्षय शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी

जालना : राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाने सरकारचंही लक्ष वेधून घेतलं आहे. आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. आता सरकारचं शिष्टमंडळ उद्या शुक्रवारी लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या सरकारच्या शिष्टमंडळावर हाके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारच्या शिष्टमंडळावर भाष्य करताना हाके म्हणाले, 'मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या शिष्टमंडळ पाठवणार असल्याचे सांगितले. आम्ही दोनच प्रश्न विचारले, शिष्टमंडळ कशासाठी पाठवतात? मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर समाधानी नसून ते ठोस काही बोलत नाही. गुळगुळीत उत्तर देतात.मी शिष्टमंडळाशी बोलणार सुद्धा नाही, त्यांनी त्यांची भूमिका मांडायची निघून जायचं'.

पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी जरांगेंनी सभा घेतल्या, असा आरोप करत हाके पुढे म्हणाले, 'सर्व माध्यमांना माहिती आहे. त्यांचे दौरे माहिती आहे. ते आमच्या माढ्याकडे आले होते. त्यांचं शेड्युल आलं होतं. तुम्हाला शेड्युल देईल, त्यांनी कुठे कुठे बैठका घेतल्या'.

'जातीय विद्वेष पेरला गेला. त्याचा परिणाम किती झाला मला माहीत नाही. ते प्रभावी पॅसिफिक नेतृत्व नाही. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये विष पेरण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी बैठका घेतल्या. चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील, पंकजा मुंडे, महादेव जानकर कसे पराभूत होतील? बैठकांचं सोडा, त्यांचं जाहीर विधान आहे की, पराभव करा. पुढील पाच पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे, असं त्यांचं विधान आहे, असे हाके म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांना भेटल्यानंतर अश्रू अनावर झाले, यावर बोलताना हाके म्हणाले, 'ही समूहाची भावना आहे. त्यावेळी त्यावेळेस भावना अनावर होते. मी मागासवर्गीय आयोगाचा सदस्य होण्याआधी अनेक बैठका आणि सभा घेतल्या. लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

गरमा गरम चहासोबत खा पोहा कचोरी, घरी बनवण्याची सोपी रेसिपी

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात हत्याकांडाचा थरार, डोक्यात दगड घालून तरुणाला जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT