OBC Laxman Hake News  Saam TV
महाराष्ट्र

Laxman Hake : धमक असेल तर आडवे या, पळून कशाला गेलात? लक्ष्मण हाके खवळले, पाहा VIDEO

OBC Laxman Hake News : पुणे येथे सोमवारी झालेल्या राड्यामागे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

Satish Daud

मराठ्यांना अजितबात ओबीसी प्रवर्गात घेऊ नका, असं म्हणत वडीगोद्रीत उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना सोमवारी रात्री मराठा आंदोलकांनी पुण्यात घेराव घातला. लक्ष्मण हाकेंनी मद्यपान केलं असून त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, असा आरोपही मराठा आंदोलकांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. दरम्यान, या वादावर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली.

पुणे येथे सोमवारी झालेल्या राड्यामागे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. इतकंच नाही तर, त्यांनी मराठा आंदोलकांना देखील खुलं आव्हान दिलं. मी माझं आंदोलन सुरुच ठेवणार असून तुमच्यात धमक असेल तर आडवे या पळून कशाला गेलात? असा तिखट सवाल हाकेंनी विचारला.

लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पुन्हा एकेरी शब्दात उल्लेख करत टीका केली. माध्यमांसोबत बोलताना हाके म्हणाले, "राजेशाही संपली असून लोकशाही आहे. हे भेकड आहे. तुमच्यात धमक असेल, तर आडवे या, पळून कशाला गेलात. अमित देशमाने आणि मते नावाच्या मुलांनी कुणा-कुणाला फोन लावले, याची माहिती घेतली, तर हा पूर्वनियोजित कट कसा होता? हे सगळ्यांना कळेल, असा आरोप हाके यांनी केला.

पुढे बोलताना हाके म्हणाले, हा ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. पण आम्ही छत्रपतींच्या आणि त्यांच्या गादीच्या मानणारे माणसं आहोत. कोल्हापूरचा नेता रयतेचा राजा असता, तर ओबीसी आंदोलनाला भेट द्यायला असता", असा टोलाहा हाके यांनी संभाजीराजे छत्रपतींना लगावला. "मी ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रासमोर मांडली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कारभार आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पाहिले. मात्र, या माणसाने माझ्या अंगावार मारेकरी घातले," अशी टीकाही हाके यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT