Laxman Hake On Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Laxman Hake : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून पळ का काढला? लक्ष्मण हाकेंचा सवाल

laxman hake : दगडापेक्षा वीट मऊ, ओबीसीने महायुतीला पाठिंबा द्यावा म्हणून ओबीसीने महायुतीला पाठिंबा द्यावा, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

Namdeo Kumbhar

laxman hake on manoj jarange patil : मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून पळ का काढला? लक्ष्मण हाकेंनी असा सवाल उपस्थित केला. लक्ष्मण हाके जालन्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याशिवाय महायुतीला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दगडापेक्षा वीट मऊ म्हणून ओबीसीने महायुतीला पाठिंबा द्यावा, असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाला केलंय . राज्यांमध्ये ज्या ठिकाणी ओबीसींची उमेदवार उभे नाहीत, त्या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं देखील लक्ष्मण आहे यांनी जाहीर केलंय. लक्ष्मण हाके यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवारांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्यामुळे ते महिला मुख्यमंत्री पाहायला आवडेल असं म्हणाले असल्याची टीका देखील यावेळी लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर केली आहे . तर जरांगेंच्या येवला दौऱ्यावरून देखील लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे...

जालना जिल्ह्यात या उमेदवारांना हाकेंचा पाठिंबा....

घनसावंगी- कावेरी खटके, वंचित

जालना - अशोक पांगारकर, अपक्ष ( भाजपा बंडखोर)

जाफराबाद - दीपक बोराडे, वंचित

परतूर - रामप्रसाद थोरात, वंचित

बदनापूर - सतीश खरात, वंचित

लक्ष्मण हाके काय म्हणाले ?

जरांगेनी निवडणुकीतून पळ का काढला?

जरांगे नावाच्या माणसाकडे निवडणूक लढवण्यासाठी भांडवल नव्हतं....

छगन भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी येवला येथे गेले

येवला येथे जाऊन जरांगे म्हणाले, येवला तुमची जहागीर आहे का? महाराष्ट्र काय तुमची जहागिरी आहे का?

कुणबी आणि मराठा एक आहेत, असं कुणी सांगितलं.

मराठा समाजाला कुणबी मानणं म्हणजे मूर्खपणा आहे.

पवार साहेबांची टोळी तुतारीची टोळी महाराष्ट्रात द्रोह करत आहे .

उत्तमराव जानकर यांनी धनगरांचा नेता म्हणून घनसावंगी येथे सभा घेतली. स्वतः sc च्या प्रमाणात्रावर निवडणुक लढवत आहेत.

दगडापेक्षा वीट मऊ म्हणून ओबीसीने महायुतीला पाठिंबा द्यावा.

रोहित पवार यांची वार रूम कोणासाठी काम करत होती.

शरद पवार यांना मराठा आणि ओबीसींनी पाडलं नाही, शरद पवारांना त्यांची लेक मुख्यमंत्री झाली पाहिजे असं वाटतं.

शरद पवार यांनी निवडणूका जिंकण्याचा व्याकरण आत्मसात केलय.

ज्या ठिकाणी आमची माणसं उभं नाहीत, तिथं महायुतीला पाठिंबा देणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT