Pandharpur News Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake : पंढरपूरमध्ये राजकारण तापलं! लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते आमने सामने

Pandharpur News : पंढरपूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी शाब्दिक वाद झाला. "एक मराठा लाख मराठा"च्या घोषणांमुळे वातावरण तापलं आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला.

Alisha Khedekar

राज्याच्या राजकारणातुन मोठी बातमी समोर आली आहे. लक्ष्मण हाके हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. अशातच शाब्दिक वादावादीतून लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आमने सामने भिडले. याघटनेत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टाळाला.

लक्ष्मण हाके आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. "एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो" अशी घोषणाबाजी केली. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली.

हा वाद टोकाला गेल्याने लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यादरम्यान वाद चिघळल्याने तुफान मारामारी झाली. प्रसंगाचं गांभीर्य पाहून लक्ष्मण हाके यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळाला.

हाके यांचा जरांगे पाटलांना टोला

धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, "जरांगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दे आणि आरोपांवर गृह विभाग तपास करेल. धनंजय मुंडे असे काही करतील असे वाटत नाही. जरांगे यांनी मिडिया ट्रायल बंद करावी. " असा टोला हाके यांनी लगावला

जरंगेंच्या हत्येच्या कटाबाबत काय म्हणाले साखळकर?

दरम्यान सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामागचा मास्टर माईंड लवकरात लवकर शोधून काढावा अन्यथा मराठा समाज राज्यात तांडव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला. शिवाय प्रसंगी महाराष्ट्र देखील बंद करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT