Gautami Patil On Politicians Saam TV
महाराष्ट्र

Gautami Patil On Politicians: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; गौतमीचं पहिलंच उत्तर जोरदार व्हायरल

तिचं लग्न कधी होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना जाणून घ्यायची असतात.

Ruchika Jadhav

Gautami Patil : गौतमी पाटीलने तिच्या दमदार नृत्याने तरुणाईला भूरळ घातली आहे. सध्या तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांच्या मनातली उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. गौतमी कुठे राहते. तिचं शिक्षण किती, तिला काय आवडतं एवढंच नाही तर तिचं लग्न कधी होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चाहत्यांना जाणून घ्यायची असतात. अशात आता गौतमीने राजकारणावर देखील एक प्रतिक्रीया दिली आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

गौतमीला उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे असा प्रश्न विचारल्यावर तिने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. सध्या राज्याचं राजकारण बरंच तापलं आहे. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडल्याने तुम्ही नेमके कोणत्या गटात यावर उत्तर देताना भल्याभल्या पदाधिकाऱ्यांची गोची होत आहे. अशात गौतमीतर एक साधी मुलगी आहे. मात्र यावेळी तिने निट विचार करुन आपलं उत्तर दिलंय.

काय म्हणाली गौतमी?

दॅट ऑफ इंजिनिअर या युट्यूब चॅनलवर गौतमीने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या आयुष्यातील अनेक चांगले आणि वाईट प्रसंग चाहत्यांशी शेअर केले. यावेळी तिने आपल्या वडलांची देखील आठवन सांगितली आणि आईने केलेलं कष्ट देखील सांगितलं. या मुलाखतीमध्ये एक रॅपिड फायर राउंड देखील होता. तेव्हा गौतमीला उद्धव ठाकरे की, एकनाथ शिंदे हा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न समोर येताच गौतमी शांत झाली.

पुढे काय बोलावे हे तिला सुचत नव्हते. नंतर ती अचानक हसू लागली. तसेच आपल्या उत्तरामध्ये ती म्हणाली की, तुला मला मार खायला लावायचं आहे की, माझा मार तुला खायचा आहे, त्यानंतर गौतमी आणि मुलाखत घेणारा तरुण दोघांमध्येही एकच हशा पिकला. गौतमीला हा प्रश्न विचारल्यावर ती यावर नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष वेधलं होतं. मात्र तिने एका वाक्यातच विषय संपवला आहे. तिने या प्रश्नावर जास्त बोलणे टाळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT