Latur Female Traffic Police video News Saam tv
महाराष्ट्र

Latur Women Constable : दीड दमडीचा वकील; लातुरातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ

Latur Female Traffic Police video News : लातुरातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. दीड दमडीचा वकील असं म्हणत पोलीस कर्मचाऱ्याने वकिलाला म्हटलं आहे.

Vishal Gangurde

संदीप भोसले, साम टीव्ही

Latur : लातूर शहरातील वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या महिला कॉन्स्टेबलने रस्त्यावर थेट वकिलासोबत वाद केल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड दमडीचा वकील म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्याने वकिलासोबत बाचाबाची केली. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल ही वकील आणि त्याच्या साथीदाराला सुनावत असल्याचे दिसत आहे. सोमवारी याच महिला पोलीस कॉन्स्टेबलने ट्रिपल सीटवरून तीन तरुणींना सुनावलं होतं.

लातूरमधील वादग्रस्त असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला पोलीस प्रणिती मुसने यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. दीड दमडीचा वकील, कुठे टाकायचा तिथे व्हिडिओ टाक, अशा शब्दात महिला पोलीस कॉन्स्टेबलने वकिलाला सुनावलं. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका वकील प्रवाशांसोबत चांगलीच हुज्जत घातली आहे. अरेरावीची भाषा करीत कॉन्स्टेबल वकिलावर दरडवताना दिसत आहे.

लातूर शहरच्या वाहतूक शाखेतील महिला पोलीस प्रणिती मुसने यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वकिलांना चांगलंच सुनावलं. या आधी महिला पोलिसाने ट्रिपल सीट घेऊन दुचाकी चालवणाऱ्या तरुणींना झापलं. तरुणी आणि महिला पोलिसाची चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर आता महिला पोलीस कर्मचाऱ्याने दीड दमडीचा म्हणत वकिलाला वाहतुकीचे नियम सांगितले.

दोघांमध्ये शाब्दिक चकमक होतानाचा क्षण काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. याच महिला पोलिसाचा आता दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अरेरावीवर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लातुरातील या पोलीस कर्मचाऱ्याने सकाळीच तीन तरुणींची माफी मागितली. मात्र, दुपारी या तरुणींनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली. त्यामुळे आता महिला पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Water Issue : कल्याणमध्ये पाणी समस्येवरून मनसेचा संताप; केडीएमसीच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातला ‘चपलेचा हार’

WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयानं भारताचं गणित बिघडलं; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Maharashtra Politics: जळगावमध्ये शिंदे गटाची ताकद वाढली, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्ते गळाला

Maharashtra Live News Update: सुट्टीवर गेलेल्या पावसाने पुण्याच्या ग्रामीण भागात लावली हजेरी

Sonali Kulkarni Photos: कसली भारी दिसतेय... सोनाली, साडीतील नवीन फोटो पाहिलात का?

SCROLL FOR NEXT