Latur : बस चालकाचा उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : बस चालकाचा उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न!

गेल्या सहा दिवसापासून संपूर्ण लातूर विभागातील बस चालक व वाहक यांनी बेमुदत बंद पुकारला असून जिल्ह्यातील 5 ही आगारात बसेस थांबून आहेत.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : गेल्या सहा दिवसापासून संपूर्ण लातूर विभागातील बस चालक व वाहक यांनी बेमुदत बंद पुकारला असून जिल्ह्यातील 5 ही आगारात बसेस थांबून आहेत. यामुळे एस टी महामंडळाला आर्थिक नुकसान होत आहे. एसटी महामंडळाला खाजगीकरणातून शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी सर्व एस टी कर्मचारी हे आंदोलन करत आहेत.

हे देखील पहा :

कामावर रुजू व्हा असं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. याबाबत लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देखील दिले आहेत. यासाठी लातूरचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर हे जिल्ह्यातील सर्व आगारांना भेट देत कामावर रुजू व्हा अस आवाहन करत आहेत.

आज निलंगा आगारात एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा असं सांगितलं पण अनेकांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान बस चालक बालाजी पांचाळ यानी नव्या बस स्थानकाच्या इमारतीवरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला माञ काही उपस्थित कर्मचारी व लोकांनी प्रसंगसावधेने त्याचा पाठलाग करून त्याचा जीव वाचवला यामुळे मोठा अनर्थ घडला नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT