latur crime news, mobile, latur police, latur news saam tv
महाराष्ट्र

आठ माेबाईल, एका दुचाकीसह दाेन युवक अटकेत; गांधी चौक पोलिसांची कारवाई

पाेलीसांच्या पथकास मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी गांधी मार्केट गाठले.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर (latur) शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना दमदाटी करून त्यांच्याकडून माेबाईल हिसकावून घेणा-या दाेन युवकांना लातूर पाेलीसांनी अटक (arrest) केली आहे. या प्रकरणात पाेलीसांनी दाेघांकडून एक दुचाकी व आठ मोबाईल (mobile) असा एकूण एक लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (latur latest marathi news)

लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्हात तपासासाठी पोलीस पथक तयार करण्यात आली आहे. या पथकास दोन मुले गांधी चौक मार्केट मधील मोबाईल दुरुस्तीच्या दुकानांमध्ये त्यांच्याकडील मोबाईलला सॉफ्टवेअर मारून मोबाईलचा लॉक तोडण्या संबंधी विचारपूस करीत फिरत आहेत अशी माहिती मिळाली.

पोलिस गांधी मार्केट येथे गेले असता त्यांना आजिम कासिम सय्यद आणि कृष्णा दिगंबर भोसले हे दाेन युवक संशयितरित्या वावरताना आढळली. पाेलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली. त्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले. पाेलीस खाक्या दाखवताच ती घडाघडा बाेलू लागली.

पाेलीसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण आठ मोबाईल फोन आढळून आले. हे मोबाईल लातूर शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना दमदाटी करून हिसकावून घेतल्याचे त्यांनी पाेलीसांना सांगितले. दरम्यान पाेलीसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचारी व चोरीचे आठ मोबाईल असा एकूण एक लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Gaurav Din Wishes: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Pakistani Bangles Designs: हिरे, लटकन आणि घुंगरू; पाकिस्तानी बांगड्यांच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

Chinmay Mandlekar Fraud Call: 'पैसे भर नाहीतर...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल, नेमकं प्रकरण काय?

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे ₹२००० मिळवण्यासाठी फार्मर आयडी गरजेचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा सविस्तर

Mumbai Pune : लोणावळा-खंडाळा घाटातील 'मिसिंग लिंक' रखडला? डिसेंबर २०२५ चे आश्वासन हुकले, आता नवी तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT