Riteish Deshmukh Speech Latur: Saamtv
महाराष्ट्र

Riteish Deshmukh: कंठ दाटला, डोळे भरले अन् रितेश देशमुख मंचावर ढसढसा रडले; हृदयस्पर्शी VIDEO

Riteish Deshmukh Emotional Speech Latur: काँग्रेस नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज लातूरमध्ये पार पडत आहे. यावेळी बोलताना रितेश देशमुख मंचावर भावुक झाले. यावेळी आई वैशालीताई देशमुख, अमित देशमुख, तसेच दिलीपराव देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आलं.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. १८ फेब्रुवारी २०२४

Latur News:

राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आज लातूरमध्ये पार पडत आहे. या सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,बाळासाहेब थोरात ,पृथ्वीराज चव्हाण ,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेते रितेश देशमुख भाषण करता करता भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

रितेश देशमुखांना रडू कोसळलं..

" वडिलानंतर काकांनी साथ दिली. काका नेहमी उभे राहिले. काकांना बोलता आलं नाही. पण आज सर्वांसमोर सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका पुतण्याचं नातं कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण आज आहे, असे म्हणत रितेश देशमुख मंचावर भावुक झाले. यावेळी आई वैशालीताई देशमुख, अमित देशमुख, तसेच दिलीपराव देशमुख यांच्या देखील डोळ्यात पाणी आलं.

साहेबांचा पुतळा पाहू प्रेरणा घ्यावी...

"मुलगा म्हणून साहेबांनी कधीच रोखले नाही. त्यांनी आम्हाला सुट दिली होती. मुलांवर कधी कशाचा दबाव टाकू नये, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्यावं. साहेबांच्या पुतळ्याकडे पाहून प्रेरणा घेतली पाहिजे. विलसासराव माणूस म्हणून काय होते हे समजेल. राजकारणात टीका कारा, पण व्यक्तिगत कोणावरही टीका करू नका हे विलासराव यांचे संस्कार आहेत आणि याचाच वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, तसेच आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो, वावरण्याचा प्रयत्न करतो, असे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमित देखमुख काय म्हणाले?

"येणारा काळ सोपा नाही, आता निष्ठा राहिली नाही, निष्ठा म्हटल्यानंतर विलासराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. आमच्या बाबतीत देखील खूप चर्चा झाल्या, मात्र मी जिथे आहे तिथे ठीक आहे. पुन्हा या महाराष्ट्रात काँग्रेसच्या ज्येष्ठ जुन्या नेत्यांचे दिवस आणायचे आहेत. आणि आता ही सगळी जिम्मेदारी आपल्यावर आहे, मी नाना पटोले तुमच्यासोबत आहेत," असे अमित देशमुख यावेळी म्हणाले अमित देखमुख यांच्या भाषणावेळी मंचावर उपस्थित विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT