Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : पोषण आहारात आळ्या आणि जाळ्या; लातूरच्या रेनापुर तालुक्यातील प्रकार

Latur News : राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडीतील मुले, शाळांमध्ये मुलांसाठी पोषण आहाराचा पुरवठा केला जात असतो. शिवाय गरोदर माता व बालकांसाठी देखील पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: पोषण आहार पुरवठा व पुरवठा झालेल्या मालाबाबत आजवर अनेक तक्रारी आल्या आहेत. पोषण आहाराच्या धान्यात आळ्या निघण्याचे प्रकार नवीन राहिले नसून याला आळा देखील अद्याप घालण्यात प्रशासनाला यश मिळालेले  आता पुन्हा एकदा लातूरच्या रेणापूर तालुक्यात पोषण आहारात आळ्या आणि जाळे लागलेले धान्य आढळून आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडीतील मुले, शाळांमध्ये मुलांसाठी पोषण आहाराचा पुरवठा केला जात असतो. शिवाय गरोदर माता व बालकांसाठी देखील पोषण आहार (Poshan Aahar) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुरवठा करण्यात येणाऱ्या मालाचा दर्जा चांगला नसून तो निकृष्ट दर्जाचा माळ असल्याचे नेहमीच समोर आले आहे. तरी देखील पुरवठा दाराविरोधात काही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे पुरवठादाराकडून निकृष्ट दर्जाचा माल पुरवठा करणे सुरूच आहे. यात (Latur) लातूर जिल्ह्यामध्ये असा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. 

लातूरच्या रेनापुर तालुक्यातल्या घनसरगाव येथे गरोदर माता आणि बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहारात आळ्या आणि जाळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घनसरगाव येथील अंगणवाडी क्रमांक २ मधून हा पोषण आहार वाटप करण्यात आला होता. दरम्यान वितरित करण्यात आलेल्या पोषण आहारात आळ्या आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

SCROLL FOR NEXT