Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: नव्या सरपंचाच्या पहिल्याच ग्रामसभेत झाला राडा; दोन गटात तुंबळ हाणामारी

नव्या सरपंचाच्या पहिल्याच ग्रामसभेत झाला राडा; दोन गटात तुंबळ हाणामारी

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर (Latur) जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा (Gram Sabha) आज प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी आयोजन करण्यात आले होती. नवनिर्वाचित सरपंच यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित पहिल्‍याच सभेत राडा झाला. यावेळी दोन आपापसात भिडले होते. (Breaking Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे नवीन सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सकाळी अकराला सुरुवात झाली. ग्रामविकास अधिकारी जयवंत कोणाळे यांनी मागील ग्रामसभेचे वाचन करून ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. दरम्यान ग्रामसभा सुरळीत चालू असताना मागील सरपंचाच्या काळात झालेल्या विकास कामाबद्दल अचानक काही तरुणांनी ग्रामविकास अधिकारी जयवंत कोनाळे यांच्या हातातील ग्रामसभेची प्रोसोडिंग हिसकावून धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले.

सरपंचाच्‍या फिर्यादिवरून गुन्‍हा नोंदची प्रक्रीया

घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनास्थळी नागलगाव बिटचे पोलीस अंमलदार रंगवाळ यांनी पोलीस पथकासह भेट दिली. ग्रामसभेत झालेल्या घटनेची माहिती ग्रामविकास अधिकारी जयवंत कोणाळे यांच्याकडून जाणून घेतली असून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: मॉइश्चराज आणि ग्लोईंग स्किनसाठी वापरा हा घरी बनवलेला फेसमास्क, ५ दिवसात दिसेल फरक

शक्तीपीठ महामार्गावरून शिंदेंच्या शिवसेनेत मतभेद, २ आमदारांमध्येच जुंपली

Hotel amenities: हॉटेलच्या रूममधील या गोष्टी तुम्ही मोफत घरी घेऊन जाऊ शकता

Deool Band 2: शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा...; 'देऊळ बंद २' चा डोळ्यात पाणी आणणारा टीझर प्रदर्शित

Avoid Rice Benefits: रात्री भात खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT