Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू; अहमदपूर तालुक्यातील घटना

Latur News : पोहत असताना नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात घडली आहे. मन्याड नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या नदीपात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले आहेत. तर एकजण सुदैवाने बचावला आहे. 

अनिल नागरगोजे व तुषार पवार असे घटनेत बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नवे आहेत. दरम्यान रविवारी सुटी असल्याने सायंकाळी अनिल नागरगोजे (वय १७) आणि तुषार पवार (वय १७) यांच्यासह त्यांचा एक मित्र असे (Latur) तिघेजण पोहण्यासाठी मन्याड नदीपात्रात उतरले होते. दरम्यान पोहत असताना नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने आपले मित्र पाण्यात बुडाल्याची माहिती गावात दिली. यानंतर नागरिक घटनास्थळी आले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अनिल नागरगोजे व तुषार पवार या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांचा शोध घेतल्यानंतर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT