Tomato Price Saam tv
महाराष्ट्र

Tomato Price: विक्रीला आणलेले टोमॅटो वाटले मोफत; भाव नसल्याने शेतकरी संतप्त

Latur News : विक्रीला आणलेले टोमॅटो वाटले मोफत; भाव नसल्याने शेतकरी संतप्त

Rajesh Sonwane

संदिप भोसले  
लातूर
: काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. कधी नव्हे तो टोमॅटोला उचांकी दर मिळाले होते. यामुळे किचनमधून (Tomato) टोमॅटो गायब झाला होता. परंतु आता टोमॅटोचे दर खाली घसरले असून दर मिळत नसल्याने (Farmer) शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले तर काहींनी ते नागरिकांना वाटले. (Live Marathi News)

लातूरच्या मुरूड येथील बाजारात विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेला टोमॅटो मोफत वाटप केलाय. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील निप्पाणी गावच्या या शेतकऱ्यांने  टोमॅटोला २ महिन्याआधी चांगला भाव मिळत असल्याने टोमॅटो पिकाची लागवड केली होती. टोमॅटोतुन चांगले उत्पन्न मिळू शकेल अशी आशा होती. परंतु सध्या बाजारात दर नसल्याचे उलटे चित्र झाले आहे.  

सध्या १ ते २ रुपये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने लागवडीसाठी केलेला खर्च निघत नाही, त्यामुळं मुरुड येथील आठवडी बाजारात विक्रीसाठी आणलेला टोमॅटो या शेतकऱ्यांने मोफत वाटलाय. तर लोक मोफत घेऊन जात नसल्याने रस्त्यावरही फेकलाय. या शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीज होण्याआधी शरीर देतं संकेत! सकाळच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको, लगेच तपासा ब्लड शुगर

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT