Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News : जागा वाटपावरून मविआमध्ये रस्सीखेच; लातूर जिल्ह्यातील तीन जागांवर ठाकरे गटाचा दावा

Latur News : लातूर जिल्ह्यातल्या तीन विधानसभा जागेवर उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे. यात जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि अहमदपूर या तीन विधानसभा मतदार संघावर दावा ठोकला आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघावर राजकीय पक्षांकडून दावे- प्रतिदावे करण्यात येत आहेत. या दरम्यान लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि अहमदपूर या तीन विधानसभा जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. यामुळे आता विधानसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत पुन्हा रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या तीन विधानसभा जागेवर उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे. यात जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि अहमदपूर या तीन विधानसभा मतदार संघावर दावा ठोकला आहे. या तीन मतदार संघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे ह्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे; अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे (sushma Andhare) यांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून पुन्हा एकदा रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 

अमित देशमुखांच्या दाव्यावर अंधारेंची प्रतिक्रिया 

दरम्यान या अगोदर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) नेते तथा काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी देखील लातूरच्या सर्वच सहा विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. मात्र अमित देशमुख हे स्थानिक नेते म्हणून बोलले असतील; त्यामुळे त्यांचा दावा हा अधिकृत नाही. अधिकृत दावा हा नाना पटोले यांचा आहे. जर त्यांनी दावा केला तर त्यावर आम्ही उत्तरे देऊ; अशा प्रकारची प्रतिक्रिया  यावेळी सुषमा अंधारे यांनी अमित देशमुख यांच्या केलेल्या दाव्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT