Latur News Saam Tv
महाराष्ट्र

चोरी गेलेल्या पिकअपसह दोघा आरोपींना अटक; १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लातूर येथील सम्राट चौक येथून चोरीला गेलेल्या बोलेरो पिकअपसह दोन आरोपींना २४ तासात अटक करण्यात गांधी चौक पोलिसांना (Police) यश आले आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर येथील सम्राट चौक येथून चोरीला गेलेल्या बोलेरो पिकअपसह दोन आरोपींना २४ तासात अटक करण्यात गांधी चौक पोलिसांना (Police) यश आले आहे. यावेळी पोलिसांनी १४ लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे.

लातूर (Latur) शहरातील सम्राट चौक येथून एमएच २४ एफ ९८३६ या क्रमांकाचा बोलेरो पिकअप चोरीला गेला होता. २८ जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी पिकअप लंपास केली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास करीत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली. चोरीस गेलेले पिकअप वाहन वैराग ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर एका ढाब्याच्या बाजूला लपवून ठेवलेले आहे, अशी माहिती मिळाली. पोलीस पथकाने या माहितीच्या आधारे वैराग ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर पाहणी केली. पथकाने या परिसरात सापळा लावला. दरम्यान, पिकअपमध्ये दोन व्यक्ती बसत असताना त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता अकबर हसन शेख, सचिन शेषेराव मोरे अशी त्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हृदयद्रावक! थाटामाटात लग्न लागलं, वरात निघाली; भीषण अपघातात नवरा-नवरीसह ७ जणांचा मृत्यू

Guru Nakshatra Gochar: २८ नोव्हेंबर रोजी गुरु बदलणार नक्षत्र; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Romantic Places In Mumbai: मुंबईतील 'हे' रोमँटिक ठिकाण जेथे वाहतात प्रेमारे वारे

Ajit Pawar News : बारामतीत काका-पुतण्यात पुन्हा जुंपली, पाहा Video

IPL 2025 Auction: 13 ते 42...कोण आहे IPL लिलावात नाव नोंदवणारे सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू?

SCROLL FOR NEXT