Nana Patole Saam tv
महाराष्ट्र

Nana Patole : देवेंद्र फडणवीस स्वत: निवडून येणार नाहीत; अमित शहांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Latur News : छगन भुजबळ यांनी खरं सांगितलं. हे त्यांच्याच आघाडीतले लोक म्हणत असतील आणि ज्या नवाब मलिक यांना दाऊदचा सोबती म्हणून जेलमध्ये टाकलं

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : देवेंद्र फडणवीस हे स्वतः देखील निवडून येणार नाहीत आणि त्यांचा पक्षही निवडून येत नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कुठून मुख्यमंत्री बनणार हा प्रश्न आहे; असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शहा यांच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील, या संकेतावर केले आहे. 

लातूरच्या (Latur) निलंगा येथे काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांच्या प्रचार सभेनंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे. देशामध्ये हिटलरशाही सुरु आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी खरं सांगितलं. हे त्यांच्याच आघाडीतले लोक म्हणत असतील आणि ज्या नवाब मलिक यांना दाऊदचा सोबती म्हणून जेलमध्ये टाकलं. तेच आज महायुतीचे उमेदवार आहेत. (BJP) भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता महाराष्ट्राला दिसत आहे; अशी प्रतिक्रिया देखील नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.  

लोकशाहीसाठी कलंक 

प्रधानमंत्री पदावर असलेल्या व्यक्तींने असं स्टेटमेंट करणं हे लोकशाहीसाठी एक प्रकारचं कलंक आहे. नरेंद्र मोदी म्हणून ते हे विधान करू शकतात. मात्र देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने देशातील लोकांमध्ये विभाजन करण्याची मानसिकता निर्माण केलेली आहे. देश वाटला गेला आहे आणि देश हे सांभाळू शकत नाही हे घाबरून गेले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून हे दिसत आहे. अशी प्रतिक्रिया पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है, तो सेफ है वक्तव्य केले, या विधानावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी प्रतिउत्तर देत निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT