लातूर : सहा महिन्यांपुर्वीच मे महिन्यात विवाह (Marriage) झाला होता. यानंतर सहा महिन्याच लातूरमध्ये नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Crime News) केल्याची घटना घडली आहे. परंतु ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. (Live Marathi News)
कोमल अजय बिराजदार (वय १९) असे नवविवाहितेचे नाव असून आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. लातूर (Latur) जिल्ह्यातील हेर कुमठा गावात घटना घडली. मृत नवविवाहिता ही मूळची नायगाव तालुक्यातील अल्लू वडगावची आहे.
उदगीर तालुक्यातील हेर कुमठा इथे एका नवविवाहित मुलीने आज सकाळी गळफास घेतला. परंतु, गळफास नसून सासरच्या लोकांनी नवविवाहितेची हत्या केली, असा आरोप नवविवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. कोमलची आई पापड बनवण्याचे काम करते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच कोमल सासरच्या जाचाला सामोरी गेली.
औषधोपचाराचा खर्चासाठी तगादा
सतत होणाऱ्या पैश्यांच्या मागणीमुळे कोमल त्रस्त होती. यातच काही दिवसांपूर्वी कोमल आजारी पडली. सोलापूर इथे तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यात दोन लाख रुपयांचा खर्च आला. त्यातील किमान एक लाख रुपये तरी माहेरवरुन घेऊन ये; असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता. काल रात्री तिचा गळा दाबून जीव घेण्यात आहे. आता आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.