Latur Congress Saam tv
महाराष्ट्र

Latur Congress: लातूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मतभेद; जिल्हा उपाध्यक्षांकडून जिल्हाध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप

लातूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मतभेद; जिल्हा उपाध्यक्षांकडून जिल्हाध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप

दीपक क्षीरसागर

लातूर : जिल्ह्यातील औसा शहरात तालुक्यातील नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित केला होता. दरम्यान जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी 'एकाला चलो रे' भूमिका घेतली असल्याने (Congress) काँग्रेसमध्ये गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. (Tajya Batmya)

सरपंच सदस्‍यांच्‍या सत्‍कार कार्यक्रमाला जिल्हा युवक काँग्रेसचे आणि औसा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले नव्हते. या कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचा संशय खुद्द जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हणमंत राच्चट्टे यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी आजतागायत (Latur News) जिल्ह्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जात नसल्याचा आरोप जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हणमंत राच्चट्टे यांनी केला आहे.

मतभेद बाजूला ठेवाः आमदार देशमुख

यावर आमदार अमित देशमुख यांनी भर सभेत काँग्रेस पदाधिकारी यांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत. काँग्रेसने सामान्य माणसासाठी जो लढा उभा केला आहे. त्यासाठी आपापसातील मनभेद आणि मतभेद बाजूला सारले पाहिजे. हाच संदेश या कार्यक्रमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT