Death
Death 
महाराष्ट्र

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्‍यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्‍यू झाल्‍याचा नातेवाईकांचा आरोप

दीपक क्षीरसागर

लातुर : प्रसुतीनंतर उपचारात डॉक्टरासह परिचारीकेने दुर्लक्ष केल्यामुळे २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यु झाला. लातुर (Latur) जिल्ह्यातील उदगीर येथील सामान्य रुग्णालयात (Civil Hospital) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकाने केला आहे.

डोंगरज (ता.चाकूर) येथील कोमल समाधान कोलेवाड असे मृत महिला रुग्णाचे नाव आहे. प्रसुती वेदना होत असल्यामुळे कोमल कोलेवाड या महिलेस गुरुवारी (२५ नोव्‍हेंबर) सकाळी सहाला उदगीरच्या सामान्य रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले. गुरुवारी सकाळी आठला प्रसुती झाल्‍यानंतर रूग्ण महिलेस जास्त थंडी वाजत असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारीकेस उपचार करण्यास सांगितले. परंतु परिचारीकेची आरेरावी भाषा ऐकुन नातेवाईक भिती पोटी शांत बसले. यावेळी एकही वैद्यकीय आधिकारी उपस्थीत नव्हता. रुग्णास पुढील उपचारासाठी सांगितले असता त्यांनी टाळाटाळ केली.

अन्‍य रूग्णालयात नेले पण

रुग्णालयात सबंधीत डॉक्टर उपस्थीत नसल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णाला लातुरला घेवुन जाणार असल्याचे सांगितले. रुग्णाला जास्त त्रास होत होता; उपचार मिळायला बराच वेळ गेल्याने दुपारी रुग्णाचा मृत्यु झाला. घाबरलेल्या अवस्थेतील नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोष करत शहर पोलीस ठाणे गाठुन डॉक्टरांनी योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे रूग्णाचा मृत्यु झाला असल्‍याचे सांगत मृत्युस जबाबदार असलेल्‍या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत महिलेचे पती समाधान कोलेवाड यांनी केली.

तज्ञ डॉक्‍टरांच्‍या उपस्थीतीत शवविच्छेदन

इनकॅमेरा शव विच्छेदन करुन रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी नातेवाईकाने तहसिलदार यांच्याकडे केली होती. त्यामुळे उदगीरच्या रुग्णालयात इनकॅमेरा शव विच्छेदनाची सोय नसल्यामुळे मयत महिलेचा शव पोलीस बंदोबस्तात लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला रात्री उशीरा पाठवण्यात आले होते. आज (२६ नोव्‍हेंबर) दुपारी दोनला तज्ञ डॉक्टरांची समितीच्या उपस्थीतीत शवविच्छेदन करुन मयत महिलेचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्त करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; भांडूपमधून साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त

Gondia News: अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण; सामूहिक अत्याचार करुन हत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar Lok Sabha: शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

Shivsena News: शिवसेना ठाकरे गटाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के; मढवी यांना अटक तर मोरेंवर तडीपारी...

Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

SCROLL FOR NEXT