Latur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Latur Vidhan Sabha : लातूरमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच; लातूर शहर व ग्रामीण विधानसभेवर शिंदे गटाचा दावा

Latur News : विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष आणि पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहेत. विधानसभांच्या जागांवर दावा देखील ठोकण्यात येत आहेत

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार लातूरमध्ये देखील सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येते आहे. या दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha election) लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष आणि पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहेत. विधानसभांच्या जागांवर दावा देखील ठोकण्यात येत आहेत. प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये लढत राहणार असली तरी जागा वाटपावरून मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच होत असल्याचे पाहण्यास मिळू लागले आहे. दरम्यान अधिकृत जागावाटप होण्या अगोदरच (Latur) लातूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडीतल्या पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे. 

दोन्ही जागांवर दावा 

मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही जागांवर दावा ठोकण्यात आला आहे..तर या आधी लातूर ग्रामीणच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार होता. तर शहर विधानसभा परंपरेने भाजपची जागा आहे. मात्र या दोन्ही जागांवर आता महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता नेमकी कोणती जागा कुणाला सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT