Latur Crime Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime : घरावर भानामती, काळ्या जादूचे सावट; दूर करण्यासाठी अघोरी प्रयोग, ३३ लाखात केली फसवणूक

Latur News : कासीमपुरा येथील फिर्यादीच्या घरी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२४ पर्यंत संबंधितांनी संगनमत करून तुमच्या घरावर काळी जादू, करणी केल्यामुळे तुमच्या कुटुंबावर संकट असल्याची भीती दाखविली

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला जात आहे. यातून फसवणूक झाल्याचे देखील समोर आले आहे. असाच प्रकार लातूरच्या उदगीरमध्ये समोर आला असून घरावर काळी जादू, भानामतीचे सावट आहे. हे दूर करण्यासाठी अघोरी प्रयोग करत ३३ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दोन महिला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील जळकोट रोडवरील एकाच्या घरामध्ये करणी, भानामती आणि काळ्या जादूचे संकट पसरले आहे. यासाठी काही पूजा विधी करून काळी जादू घालवावी लागेल असे सांगण्यात आले. त्यानुसार कासीमपुरा येथील फिर्यादीच्या घरी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२४ पर्यंत संबंधितांनी संगनमत करून तुमच्या घरावर काळी जादू, करणी केल्यामुळे तुमच्या कुटुंबावर संकट असल्याची भीती दाखविली. 

अंगणात जादूटोणा विधी करत पुरल्या वस्तू 

कुटुंबावरील संकट आम्ही दूर करतो, म्हणून कुटुंबात भीती निर्माण करून घरातील अंगणात जादूटोणा विधी करून काहीतरी वस्तू पुरल्या. यासाठी रक्कमेची मागणी करण्यात आली होती. दरम्यान संबंधितांनी वेळोवेळी फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीचे, सुनेचे सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३३ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज घेऊन फसवणूक केली.

दोन महिलांना घेतले ताब्यात 

घरातील सोने- चांदी यासह ३३ लाखाचा गंडा घातला असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली असता या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतल आहे. पुढील चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT