संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी
Latur District Central Cooperative Bank election result : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने जोरदार विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने बँकेची सत्ता आपल्या हातात घेतली आहे. या विजयानंतर धीरज देशमुख यांनी सिटी वाजवत कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष केला.
निवडणुकीची चुरस आणि निकाल:
या निवडणुकीत सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीच्या १५ पैकी १२ जागांचे निकाल हाती आले होते, ज्यामध्ये सहकार पॅनलचे ७ तर परिवर्तन पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले होते. शेवटी सहकार पॅनलने बहुमत मिळवत बँक आपल्या ताब्यात घेतली.
या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रक्रिये उद्योग मतदारसंघातून धीरज देशमुख यांनी १५ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला, तर त्यांच्या विरोधातील परिवर्तन पॅनलचे भरत चामले यांना केवळ २ मते मिळाली. याशिवाय उदगीर सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनलच्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी १० मतांनी विजय मिळवला, तर मत्स्य आणि हाउसिंग मतदारसंघातून जयेश विश्वंभर माने विजयी झाले. दुसरीकडे, निलंगा विकास संस्थेतून भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू तथा परिवर्तन पॅनलचे प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर हे देखील विजयी झाले आहेत.
या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, अखेर सहकार पॅनलने बाजी मारत जिल्हा बँकेवर आपला झेंडा फडकवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.