Latur Crime News दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur: तरुणांची टवाळखोरी वाढली; पोलिसांनीही हिसका दाखवत १५ जणांना घेतलं ताब्यात

Latur Crime News: टवाळखोरी करणाऱ्या मुलांवर पोलीसांचे बारीक लक्षं असून काही अनूचित प्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर: लातूर (Latur) शहरातील काही तरुणांना टवाळखोरीची सवय लागली आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काल गुरुवारी, रात्री सात वाजण्याच्या सुमारास कृपा सदन रोड भागात काही तरुणांचा गट टवाळखोररी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लागलीच पोलिसांनी या ठिकाणी धडक देत १५ टवाळखोर तरुणांना ताब्यात घेतले आहे. लातूरच्या विवेकानंद पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. (Latur Crime News)

हे देखील पाहा -

कृपा सदन येथे काही तरुण मुले सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर टवाळखोरी करीत आहेत, अशी माहिती विवेकानंद चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली होती. सदर ठिकाणी तात्काळ जाऊन रात्री सात वाजण्याच्या दरम्यान टवाळखोरी करीत असलेल्या १५ मुलांना ताब्यात घेऊन म. पो. का. कलमप्रमाणे कार्यवाही केली आहे. कृपा सदन रोड येथे विविध शाळा, क्लासेस असल्यामुळे सदर ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे सदर ठिकाणी अशा प्रकारची कार्यवाही सतत करण्यात येणार आहे.

टवाळखोरी करणाऱ्या मुलांवर पोलीसांचे बारीक लक्षं असून काही अनूचित प्रकार आढळल्यास तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरची कामगीरी ही पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर येथील पो.नि. सुधाकर बावकर, पोउपनि महेश गळगटे आणि चार्ली पथक यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT