Latur Crime Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime : मध्यरात्रीचा थरार..दरोडा टाकत वृद्धाचा खून; अहमदपूर तालुक्यातल्या रूद्धा शिवारातील घटना

Latur News : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रूद्धा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे.

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानी सशस्त्र दरोडा टाकला. घरात प्रवेश केल्यानंतर वृद्ध पती- पत्नीला मारहाण करत त्यांच्याजवळील दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. दरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर महिला बेशुद्ध झाली आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रूद्धा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे. रावसाहेब केंद्रे (वय ६२) असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. रावसाहेब केंद्रे हे पत्नी व मुलांसह शेतात घर बांधून वास्तव्यास राहत होते. दरम्यान शेतशिवारात वस्ती नसल्याने याचा फायदा घेत तीन चोरट्यांनी मध्यरात्रीच्या (Crime News) सुमारास धाडसी दरोडा टाकत चोरी केली आहे. यावेळी चोरट्यानी दोघा पती- पत्नीला बेदम मारहाण केली. यात रावसाहेब केंद्रे यांचा मृत्यू झाला. 

मध्यरात्री तीन चोरट्यांनी केंद्रे यांच्या घरावरती दरोडा टाकत घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५३ हजाराचा मुद्देमाल चोरी केला आहे. मात्र दुर्दैवी घटना म्हणजे रावसाहेब केंद्रे व त्यांच्या पत्नी या दोघांना जबर मारहाण झाली. यात पत्नी बेशुद्ध झाली, मात्र पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती सकाळी समजल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर घटनास्थळाची पोलीस अधिकारी आणि श्वान पथकाने पाहणी केली आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT