Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: रामलिंग मुदगड येथे घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला

रामलिंग मुदगड येथे घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लांबवला

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील शेतकरी (Farmer) महादेव अभिमन्यू गोरे यांच्या राहत्या घरी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी (Theft) केल्याची घटना घडली. या चोरीत एकूण ३ लाख ३५ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. (Tajya Batmya)

लातूर जिल्‍ह्यातील रामलिंग मुदगड येथील शेतकरी महादेव अभिमन्यू गोरे यांच्या घरात पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. मेनचॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटाचे दार उचकटून व लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी महादेव गोरे यांनी कासार सिरसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्‍याचे दागिने, रोख रक्‍कम लंपास

कपाटात ठेवलेले एक सोन्याचे गंठण, एक सोन्याचे नाल, एक जोड सोन्याचे झुमके, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि १ लाख ५० हजार रुपये रोख असे एकूण ३ लाख ३५ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Nakshatra Gochar: २८ नोव्हेंबर रोजी गुरु बदलणार नक्षत्र; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Romantic Places In Mumbai: मुंबईतील 'हे' रोमँटिक ठिकाण जेथे वाहतात प्रेमारे वारे

Ajit Pawar News : बारामतीत काका-पुतण्यात पुन्हा जुंपली, पाहा Video

IPL 2025 Auction: 13 ते 42...कोण आहे IPL लिलावात नाव नोंदवणारे सर्वात युवा आणि वयस्कर खेळाडू?

Health Tips: हिवाळ्यात मधुमेहावर 'ही' फळे, भाज्या गुणकारी

SCROLL FOR NEXT