Latur Crime Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime : जागेवर झोपल्याने राग अनावर; डोक्यात दगड टाकून संपविले, लातूरमधील धक्कादायक घटना

Latur News : लातूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आज पहाटे एका अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड घालत जाळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : रात्रीच्यावेळी जागेवर झोपण्यावरून वाद झाला. या वादात दारूच्या नशेत भंगारवाल्याने माझ्या जागी का झोपला म्हणून डोक्यात दगड घालून हत्या केली. हि धक्कादायक घटना लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली असून या प्रकरणातील संशयित आरोपीला पाच तासात गजाआड केले आहे. 

लातूरच्या (Latur) एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत आज पहाटे एका अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड घालत जाळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुरुवातीला संशयित आरोपी भंगारवाल्याला झोपेत दारू पिऊन मृताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच मारहाणीचा राग मनात धरून संशयित (Crime News) आरोपीने मयत लक्ष्मण गजघाटे त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायकी घटना घडली. यानंतर त्याला जाळून टाकले.  

दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तपास सुरु केला. घटनेचा तपास करत असताना संशयित आरोपी सचिन वाघमारे याला  लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या पाच तासात गजाआड केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT