महाराष्ट्र

Latur News: माणुसकी हरवली! महिला शिक्षिकेला व्यापारी दांपत्याकडून बॅटने अमानुष मारहाण; लोक फक्त बघत राहिले...

Latur News: एका महिला शिक्षिकेला व्यापारी दांपत्याने अमानुष मारहाण केल्याचे उघडकीस आले.

Gangappa Pujari

संदीप भोसले, प्रतिनिधी

Latur Crime News:

लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडलीय. लातूरमध्ये एका महिला शिक्षिकेला व्यापारी दाम्पत्याने अमानुष मारहाण केल्याचे उघडकीस आले. या मारहाणीत महिला शिक्षिकेचा एका हात फ्रॅक्चर झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भररस्त्यावर शिक्षिकेला मारहाण होत असताना पीडितेला कोणीच वाचवलं नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षिकेला मारहाण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडिता शिक्षिका ह्या शहरातील मंत्रीनगरमध्ये राहतात. त्या महापालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. घरापासून काही अंतरावर असलेल्या श्रीनिवास येथील व्यापारी गोपाल भारतलाल दरक आणि त्याची पत्नी सौ.सपना गोपाल दरक यांनी त्यांना अडवले.

तुम्ही आमच्या घराजवळ लघुशंका केल्याचा संशय व्यक्त करीत दरक दाम्पत्याने महिला शिक्षिकेला बॅटने अमानुषपणे बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत संगीता भोसले यांच्या उजव्या मांडीवर, पिंडरीवर तसेच डाव्या हातावर जबर जखमा झाल्या असून हातही फ्रॅक्चर झाला आहे. (Latur News)

दरक दाम्पत्याने संशयातून शिक्षिकेला मारहाण केली. तब्बल अर्धा तास अमानुषपणे आपल्याला मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शिक्षिकेला कसलीही मदत केली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जखमी महिला आणि त्यांच्या मुलाने केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT