Facebook Brother Saam TV
महाराष्ट्र

फेसबुक लिस्टमधील प्रत्येक मुलीला पाठवतोय रक्षाबंधन गिफ्ट; हा भाऊ आहे तरी कोण?

रामा फेसबुक लिस्टमध्ये असलेल्या तरुणी अथवा महिलांसोबत बोलण्याची सुरुवात 'ताई' या शब्दापासून करतो.

दिपक क्षीरसागर

लातूर : सध्याच्या डिजीटल युगात फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाचा (Social Media) अनेक वेळा गैरवापर होताना पाहायला मिळतं. मात्र, याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून एका युवकाने आपल्या जीवनात अनेक बहिणी जोडल्या आहेत. मागील ४ वर्षापासून हा तरुण आपल्या फेसबुक लिस्टमध्ये असणाऱ्या मुलींना-महिलांना न चुकता, राखी आणि भाऊबीज सणाला गिफ्टही पाठवतो.

यंदाही फेसबुक (Facebook) लिस्टमध्ये असलेल्या सर्व मुली आणि महिलांना राखीचं गिफ्ट पाठवले आहे. या सर्व बहिणी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून सर्वांना त्यांचं राखीचं गिफ्ट मिळालं आहे. रामा कंजे असं या तरुणाचं नाव आहे. रामाचं वय ३० असून तो मूळचा लातूरचा आहे.

पाहा व्हिडीओ -

रामाच्या फेसबुकवर आज अनेक तरुणी जोडलेल्या आहेत. रामा फेसबुक लिस्टमध्ये असलेल्या तरुणी अथवा महिलांसोबत बोलण्याची सुरुवात 'ताई' या शब्दापासून करतो. तो सर्वांना बहिणी मानतोच शिवाय भावाचं कर्तव्य म्हणून दरवर्षी रक्षाबंधन असो की भाऊबीज असो, न चुकता सर्वांना गिफ्ट पाठवतो. गेल्या चार वर्षापासून त्याचा हा उपक्रम सुरू आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रामाने फेसबुकमधील फ्रेंड लिस्टमधील महिला आणि तरुणींना रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून कंदील, कपडे पाठवले. ऑनलाइन (Online) सुविधाच्या माध्यमातून या बहिणींना आपलं गिफ्ट मिळालं आहे. ते आनंदीत झाल्या आहेत.

त्यामध्ये भक्ति जाधव (सोलापूर), सुचेता भिसे (पुणे), पूजा निचले (लातूर), अश्विनी आढव (नाशिक), पल्लवी भोसले (पुणे), सिमा राऊत पाटिल (नागपुर), सुबधा सरप पाटिल (नगर), शिवानी आदेकर (चिंच नगर, सोलापूर), वर्षा भांडे(अकोला), प्रिया बामानकर, कोमल पेठकर, श्वेता यादव, वैशाली लोंढे, पूजा निचले यांच्या अनेक बहिणींना राखी गिफ्ट पाठवले आहेत. सीताराम कंजे यांच्यावर छञपती शिवाजी महाराज याचे विचार आणि आई वडील याच्या संस्कारातून सोशल मीडियामुळे संपर्कात आलेल्या राज्यातील हजारो बहिणीचा भाऊ राया बनला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT