Snake Eating Video
Snake Eating Video Saam TV
महाराष्ट्र

Snake Eating Video: जिवंत साप तोंडात टाकून कचाकच चावला; फॅन्टासोबत साप खातानाचा VIDEO VIRAL

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशात नॉनवेज खाणाऱ्या व्यक्ती विविध मासे किंवा कोणताही मांसाहारी पदार्थ मोठ्या चवीने खातात. अशात सध्या सोशल मीडियावर एक अतिशय किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका तरुणाने खालेली गोष्ट पाहून तुमचा संताप होईल अथवा तुम्हाला याची भीती वाटेल. (Latest Snake Video)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण मस्त एका ठिकाणी बसला आहे. त्याच्या आजुबाजूला काही माणसांनी घोळका केलाय. अशात या तरुणाच्या हातात एक साप आहे. हा जिवंत साप असून सुरुवातीला असे वाटते की हा व्यक्ती एक सर्प मित्र आहे आणि तो त्याला वाचवत आहे. मात्र पुढे काही भलतंच घडतं.

जीवंत साप कचारच चावला

या व्यक्तीने सापाला आपल्या एका हातात पकडून त्याचं तोंड आपल्या तोंडात टाकून ते कचाकच चावलं आहे. सापाला चावून त्याच्या डोक्याचा तुकडा या विचित्र माणसाने तोडला. त्यानंतर त्याने बाकीचा साप जमिनीवर फेकून दिला. साप खाली टाकल्यावर हा व्यक्ती मजेत फॅन्टा ज्यूस पिताना दिसत आहे.

त्याचा हा किळसवाणा प्रकार पाहून सगळेच आवाक झालेत. त्यामुळे 'यूनिक 4us' (@ARSHAD_93900) नावाच्या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलेल्या मजकुरानुसार सदर व्यक्ती हा नैनीताल येथील एक आयस्क्रिम विक्रेता असल्याचं समजलं आहे. अशात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन्य जीव अधिनियमांतर्गत या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Lok Sabha Votting Live: श्रीनिवास पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Baramati lok Sabha : शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; १० वर्षांनी मुंबई ऐवजी बारामतीत केलं मतदान, Video

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार... ५७ हून अधिक मृत्यू; हजारो नागरिक बेपत्ता

Dharashiv Loksabha Election : रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखने बजावला मतदानाचा हक्क, लातूरमध्ये सहकुटुंब केलं मतदान

नागपूर शहरात सलग तीन दिवस भूकंपाच्या धक्क्याची नोंद, अफवांवर विश्वास ठेवू नका : भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

SCROLL FOR NEXT