Mva Seat Sharing Formula for Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra politics : मविआचा विदर्भात ३३ जागांवर तिढा, २९ जागांवर एकमत; महायुतीचं ७० टक्के जागांवर एकमत!

Latest Vidarbha Politics News in Marathi : नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार विदर्भातील वातावरण मविआसाठी पोषक असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण येथेच मविआसमोर जागा वाटपाचा पेच आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra politics News : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तसं आघाडी आणि युतीमधील जागावाटपाचा पेच समोर येत आहे. विदर्भातील ६२ जागांवर महायुती आणि मविआने लक्ष केंद्रीत केले आहे. नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार विदर्भातील वातावरण मविआसाठी पोषक असल्याचा अंदाज वर्तवला होता. पण येथेच मविआसमोर जागा वाटपाचा पेच आहे. विदर्भातील ३३ जागांवर मविआमध्ये तिढा असल्याचे समोर आलेय. विदर्भातील २९ जागांचा मविआचा प्रश्न सुटलाय. दुसरीकडे महायुतीचं विदर्भातील ७० टक्के जागांवर एकमत झालेय.

विदर्भात मविआपुढे पेच -

विदर्भातील ६२ जागांपैकी २९ जागांचा पेच सुटला आहे. या जागांवर कोणत्याही एकाच पक्षाने दावा केल्याने मविआचा पेच सुटलाय. पण ३३ जागांवरील तिढा कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील जागा वाटपात काँग्रेस नमते घेण्यास तयार नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत आतापर्यंत २९ जागांचा मार्ग मोकळा झालाय. पण ३३ जागांवर तिढा कायम आहे.

मविआचा कोणत्या जागावरील मार्ग मोकळा -

नागपूर - काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, मध्य नागपूर

भंडारा - साकोली

गोंदिया - आमगाव

चंद्रपूर - चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, राजुरा, वरोरा

वर्धा - देवळी

अमरावती - तिवसा, अमरावती, मोर्शी, बडनेरा

यवतमाळ - आर्णी, राळेगाव, उमरखेड, पुसद

अकोला - बाळापूर, अकोला, अकोला पूर्व

बुलढाणा - मलकापूर, खामगाव, शिंदखेड राजा

वाशिम - रिसोड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

SCROLL FOR NEXT