विधवा महिलेवरती आळीपाळीने बलात्कार; धर्माबाद रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार Saam Tv
महाराष्ट्र

विधवा महिलेवरती आळीपाळीने बलात्कार; धर्माबाद रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

दोन नराधमांनी एका विधवा महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेऊन आधी तिचे दागिने लुटले आणि नंतर तिच्यावरती आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड जिल्ह्य़ातील धर्माबाद रेल्वे स्थानकावर दोन नराधमांनी एका विधवा महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेऊन आधी तिचे दागिने लुटले आणि नंतर तिच्यावरती आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्री घडली आहे. पिडीत महिलेने रेल्वे पोलीस ठाणे गाठून आपल्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांनी सांगितला.

पिडीत विधवा महिला ही उमरीहून पतीच्या पेंन्शनच्या कामासाठी धर्माबाद येथे आली होती. रात्री उशिर झाल्याने महिलेला वाहन नसल्याने धर्माबाद रेल्वे स्थानकावर (Dharmabad Railway Station) थांबली असता दोन तरुणांनी ती एकटी असल्याचा गैरफायदा उचलून महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन जिवे मारण्याची धमकी देत महिलेच्या अंगावरील 75 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास करत आळीपाळीने बलात्कार केला.

हे देखील पहा -

या प्रकरणी पिडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून धर्माबाद रेल्वे पोलिसांमध्ये (Dharmabad Railway Police) दोन आरोपीं विरोध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळाला रेल्वे पोलिस अधिक्षिका मोक्षदा पाटील यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

SCROLL FOR NEXT