बारामतीमधील धक्कादायक घटना, डोक्यात, छातीत कुऱ्हाड मारून महिलेची हत्या  Saam TV
महाराष्ट्र

बारामतीमधील धक्कादायक घटना, डोक्यात, छातीत कुऱ्हाड मारून महिलेची हत्या

अंगणातून शेळ्या जाण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा मनात राग धरून बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील 50 वर्षीय महिलेची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बारामती: अंगणातून शेळ्या जाण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा मनात राग धरून बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील 50 वर्षीय महिलेची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंगूबाई मोरे असं मयत महिलेचं नाव आहे. मृत गंगूबाई यांच्या सून प्रमिला प्रमोद मोरे यांनी या हत्येबाबत फिर्याद दिली आहे की, मागील अडीच वर्षांपूर्वी भावकीतील किरण मोरे यांची प्रमिला यांच्या सासू-सासऱ्यांबरोबर अंगणातून शेळ्या जाण्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. मात्र भावकीतील लोकांनी या भांडणामध्ये मध्यस्ती केल्याने ती वाढली नाहीत.

मात्र या भांडणामुळे ही दोन कुटुंबे एकमेकांशी बोलत नव्हती. अशातच काल मृत गंगूबाई यांनी त्यांच्या सुनेसोबत जेवण केलं आणि त्यांचा मुलगा कामावरती गेला. दरम्यान गंगूबाई या आपल्या दोन नातवांना सोबत घेऊन घराजवळील कांतीलाल मोरे यांच्या शेडजवळ गेल्या असताना आरोपी किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन शेडकडे गेला आणि त्याने गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केले त्यानंतर गंगूबाई जमिनीवरती कोसळल्या सासूवरती हल्ला केल्याचं पाहताच त्यांच्या सुनेनं आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने सुनेला बाजूला ढकललं आणि पुन्हा गंगूबाई यांच्या छातीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याचं मृत गंगुबाई यांच्या सुनेनं सांगितलं.

हे देखील पहा -

दरम्यान या घटनेची माहिती प्रमिला मोरे यांनी पतीला फोनवरून दिली.आणि त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. शिवाय फिर्यादीच्या कुटुंबाने आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली होती मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह बारामतीत (Baramati) सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला आणि पोलिसांनी देखील तपास करीत किरण मोरे याला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT