Khopoli Accident News Saam TV
महाराष्ट्र

Khopoli Accident News: भाजी खरेदीसाठी गेलेल्या पती-पत्नीची ताटातूट; भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू

Accident News: घटनेचत महिलेच्या पतीला देखील मार लागला आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Ruchika Jadhav

सचिन कदम, रायगड

Khopoli News: खोपोली येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. मोटर सायकलचा अपघात झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेत महिलेच्या पतीला देखील मार लागला आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Accident News)

मिळालेल्या आधिक माहितीनुसार, खोपोली पळसदरी रस्त्यावर आज सकाळी झालेल्या मोटर सायकल अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झालाय. ही महिला आणि तिचा पती दोघेही शहरातील भाजी मार्केटमध्ये होलसेलमधून भाजी आणण्यासाठी आले होते. मात्र तिथे पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे.

नीरा सुरेश ठोंबरे असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे, निरा आणि सुरेश ठोंबरे हे पती-पत्नी मोटर सायकलवरून खोपोली भाजी मार्केटमधून होलसेल भाजी खरेदी करण्यासाठी कर्जत येथे निघाले होते. खोपोली पळसदरी रस्त्यावर कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये सुरेश ठोंबरे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली तर मागे बसलेल्या निरा ठोंबरे यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. दर दोन दिवसांनी या महामार्गावर अपघात होताना दिसत आहेत. अशात आज देखील मसृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर दोन ट्रक एकमेकांना धडकल्याने मोठी आग लागली आहे. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की यात एक ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रकचालक आणि सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT