Larvae in Baby Food Saam Tv
महाराष्ट्र

Larvae in Baby Food: बेबी फूडमध्ये आढळल्या अळ्या, एक वर्षाच्या बाळाला झालं फूड पॉयजन; आईने VIDEO शेअर करत व्यक्त केला संताप

Amaravati Viral News: अमरावतीत बेबी फूडमध्ये अळ्या आढळून आल्या असून हे बेबीफूड खाल्ल्यानंतर दीड वर्षांचं बाळ आजारी पडलंय. याचा एक व्हिडिओही बाळाचा आईने शेअर करत आपला संपात व्यक्त केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमरावतीत बेबी फूडमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. बेबीफूड बनविणाऱ्या नामांकित कंपनीच्या बेबी फूड पॉकेटमध्ये अळ्या आढळल्या आहेत. हे बेबीफूड खाल्ल्यानंतर दीड वर्षांचं बाळ आजारी पडलंय.

गेल्या तीन दिवसांपासून या बाळावर उपचार सुरू सरू आहेत. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करणार आसल्याचं बाळाच्या आईने सांगितलंय. याचा एक व्हिडिओही बाळाचा आईने शेअर करत आपला संपात व्यक्त केला आहे.

आईने व्यक्त केला संपात

व्हिडिओ शेअर करत बाळाची आई म्हणाली आहे की, ''मला एक वर्षाचं बाळ आहे. आम्ही त्याला दुधाव्यतिरिक्त पौष्टिक आहार म्हणून बेबी फूड देतो. आता त्याला (बाळाला) बेबी फूडमुळे फूड पाइजनिंग झालं असून त्याला गेल्या चार-पाच दिवसांपासून बरं नाही. डॉक्टरांना दाखवलं असताना त्यांनी फूड पाइजनिंग झालं असल्याचं सांगितलं.''

महिला पुढे म्हणाली आहे की, ''डॉक्टरांनी फूड पाइजनिंग झालं असल्याचं सांगितलं असता मी घरी येऊन बेबी फूडचे पाकीट पहिलं असता यात अळ्या आढळून आल्या आहेत.'' महिलेने संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती प्रशासनाला केली आहे.

पोषण आहाराच्या मिलेट बारमध्ये अळ्या

दरम्यान, काई दिवसांपूर्वीच अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाटमधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्या होत्या. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून मिलेट्स बार दिला जातो. मिलेट्स बारमध्ये अळ्या आढळून आल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केला होता. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT