gutka seized in sangli विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli : सांगलीत गुटख्याचा मोठा साठा जप्त; कवठेमहांकाळ पोलिसांची धडक कारवाई

Sangli Crime News | गुटख्याचा हा साठा कुठला आहे आणि कुठे जात होता याचा तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: सांगली (Sangli) जिल्ह्यात गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल ७ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा (Gutkha) जप्त केला आहे. यामध्ये एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (Sangli Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार आज, रविवारी सकाळी स्कॉर्पिओ गाडीतून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खबर कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कवठेमहांकाळ ते जत रोडवर नागोळे फाट्यावर सापळा लावला आणि ही चालकासह गाडीही ताब्यात घेत ही कारवाई करण्यात आली. यावेळी सुगंधी तंबाखू, गुटखा अशा एकूण २० पोती हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडीसुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर इथला असू निलकंठ बोरगे असे आरोपीचे नाव आहे. गुटख्याचा हा साठा कुठला आहे आणि कुठे जात होता याचा तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Banana Fry Recipe: भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

Anshula Kapoor Engaged: कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार! अंशुला कपूरच ठरलं; बॉयफ्रेंडनं 'या' ठिकाणी केलं प्रपोज

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT