palghar latest news  Saam tv
महाराष्ट्र

पालघरची भाषा मराठी की गुजराती? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO

palghar latest news : आता पालघर महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये असा सवाल निर्माण झालाय.. कारण पालघरच्या जिल्हा प्रशासनाचा मराठीद्वेष्टेपणा समोर आलाय.. तो नेमका कसा... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

हे बॅनर तुम्हाला गुजरातमधील एखाद्या रस्त्यावरच असल्यांच वाटेल . मात्र हा बॅनर आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमधील.... मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय... मात्र जणूकाही पालघरची भाषा गुजराती आहे अशा थाटात जिल्हा प्रशासनानं वाहतूक बंदीची सूचना गुजराती भाषेत लावलीय.. त्यामुळे मराठी प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय.. हा तर पालघरमार्गे मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा आरोपच विरोधकांनी केलाय..

खरंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याआधीच राज्य सरकारने 2017 मध्येच प्रशासनाने मराठी भाषेतच अधिसूचना आणि शासनादेश काढण्याचे आदेश दिले होते.. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील दुकानांवरही मराठी पाट्या लावणं बंधनकारक करण्यात आलं... असं असतानाही पालघर जिल्हा प्रशासनानं मराठीचा आदेश धाब्यावर बसवत थेट गुजराती भाषेतून वाहतूक बंदीची सूचना जारी केलीय..

पालघर जिल्ह्यात गुजराती पाट्या लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या हॉटेलच्या पाट्या गुजराती भाषेत लावण्यात आल्या होत्या.. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.आता पुन्हा एकदा पालघर जिल्हा प्रशासनानं मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय.. त्यामुळे सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं तर पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्याच घरात हाल सोसते मराठी, अशीच अवस्था अधिकाऱ्यांच्या मराठीद्वेष्ट्येपणामुळे दिसून येतेय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT