landslide in pasarni ghat 
महाराष्ट्र

पसरणी घाटातील दरड हटवली; पाचगणी, महाबळेश्वर वाहतुक संथ गतीने

घाटातून वाहने सावकाश चालवावीत असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

ओंकार कदम

सातारा panchgani latest news rain update : सातारा जिल्ह्यात गत २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. याबराेबरच आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात दरड कोसळली हाेती. यामुळे वाईहून पाचगणी, महाबळेश्वर येथे जाणारी वाहतुक खाेळंबली हाेती.

या घाटातील दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला ही दरड (landslide) कोसळली. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून दरड हटवली. सध्या वाई पाचगणी, महाबळेशश्वरला पसरणी घाटातून जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

दरम्यान या भागात सतत संतधार पाऊस पडत आहे. याबराेबरच दाट धुक्याचे प्रमाण आहे. पर्यटकांनी तसेच नियमीत येणा-या वाहनधारकांनी घाटातून मार्गक्रमण करीत असताना वाहने सावकाश चालवावीत असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT