ACB, Bribe,  Saam Tv
महाराष्ट्र

Bribe : दहा हजारांची लाच घेतल्याने भूमी अभिलेख कर्मचा-याला रंगेहाथ अटक

कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी काेणीही लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क साधा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठाेड

Yavatmal News : शेतीच्या मोजणीत त्रुटी दाखवून दहा हजाराची लाच (bribe) मागणारा भूमीअभिलेख कार्यालयातील भूमापक एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई यवतमाळ एसीबीच्या (yavatmal acb) पथकाने वणी येथे केली. के.एम.कवडे असे लाचखोर भूमापकाचे नाव आहे. (Maharashtra News)

नांदेपेरा मार्गावरील एका हॉटेलमध्ये रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांची तालुक्यातील पुरड (नेरड) येथे शेती आहे. शेतीची मोजणीसाठी आवश्यक शुल्क भरुनही भूमापक के.एम कवडे हा मागील एका वर्षापासून त्रुटी दाखवून मोजणीसाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी करीत होता. तडजोडीनंतर आरोपी 10 हजार घेण्यास तयार झाला.

परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यवतमाळ लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने तक्रारीची खात्री करून सापळा रचला. रविवारी शेतीची मोजणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी भूमापककडून मोजणीशीट घेऊन पैसे देण्यासाठी नांदेपेरा मार्गावर एका हॉटेलमध्ये जेवण्याच्या निमित्ताने बोलाविले. हॉटेलमध्ये बसून तक्रारदार यांनी कवडे यास 10 हजार रुपये दिले.

त्यानंतर एससीबीच्या पथकाने हाॅटेलात प्रवेश करुन कवडे याची चाैकशी करुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर लाचलुचपत विभागाचे अधिकारी यांनी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (ला.लु.प्र.वि. यवतमाळ) ज्ञानेश्वर नालट, पोलीस अंमलदार सचिन भोयर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, महेश वाकोडे, चालक संजय कांबळे यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT