Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Shocking: शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार! नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाचा जीव घेतला, ८ जण गंभीर

Buldhana Crime: बुलडाण्यात शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दोन गटामध्ये झालेल्या या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली.

Priya More

Marathi Headlines

  • बुलडाण्यात शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, ८ जण गंभीर

  • नातेवाईकांमध्ये रक्तरंजित संघर्ष! शेतीच्या वादातून एकाचा जीव घेतला

  • शेती वादातून नातेवाईकांमध्येच ही तुंबळ हाणामारी झाली.

  • याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली

संजय जाधव, बुलडाणा

शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुलडाण्यात घडली. शेतीच्या वादातून एकमेकांच्या जीवावर उठले. या हाणामारीत एकाचा मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मेहकर तालुक्यातील नागापूर येथे घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटाकडील १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर येथे शेतीच्या वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणात डोणगाव पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे . महत्वाचे म्हणजे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात पहिली तक्रार विकार खां जाबीर खां पठाण यांनी डोणगाव पोलिसात केल्याने दुसऱ्या गटातील ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या गटातील सय्यद इमरान सय्यद रहीम यांनी सुद्धा तक्रार दिल्याने १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या हाणामारीच्या घटनेते सय्यद अय्याज सय्यद वाहेद यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शेतीच्या वादातून झाली असून पोलिस या घटनेचा तपासा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

Dapoli : कड्यावर वसलेलं गणपतीचं सुंदर मंदिर, दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

SCROLL FOR NEXT