LADKI BAHIN YOJANA saam tv
महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? महिलांचं टेंन्शन वाढलं

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारकडून 26 प्रमुख योजना आणि 25 धोरणांचा रिअल टाइम पद्धतीने आढावा घेतला जाणार आहे. IIM मुंबईत 24 सदस्यांचा महा-टॅक कक्ष कार्यरत राहणार असून योजनांच्या खर्चासह अंमलबजावणीचे तिमाही मूल्यमापन केले जाणार आहे.

Omkar Sonawane, Bharat Mohalkar

राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीचा आता रिअल टाइम पद्धतीने आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत IIM मुंबईच्या माध्यमातून महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष अर्थात महा टक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील लाडकी बहीण योजनेसह 26 प्रमुख योजनांचे 25 धोरणांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

IIM मुंबईत 24 सदस्यांचा ‘महा-टॅक’

IIM मुंबई येथे 24 सदस्यांचा महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष म्हणजेच ‘महा-टॅक’ कार्यरत राहणार आहे. हा कक्ष मुख्यमंत्री कार्यालयाच्या अंतर्गत काम करेल. राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीचे विश्लेषण करून सरकारला निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि शिफारशी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या कक्षाची असेल.

महा टॅकच्या मध्यमातून राज्यातील 25 प्रमुख धोरणांचे विश्लेषण केले जाणार आहे. यामध्ये उद्योग IT,GCC,AVGC-XR, इलेक्ट्रिक वाहन, हरित हायड्रोजन, पर्यटन, गृहनिर्माण, चौथे महिला धोरण तसेच राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा समावेश आहे.

26 योजनांचे दर तिमाही मूल्यमापन

राज्यातील 26 प्रमुख योजनांचे दर तिमाही समांतर मूल्यमापन केले जाणार आहे. योजनांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, त्यासाठी झालेला खर्च किती आहे आणि अपेक्षित परिणाम साध्य होत आहेत का, याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून दर सहा महिन्यांनी या योजनांचा आणि धोरणांचा आढावा घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनिल तटकरेंना कोण करतंय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

SCROLL FOR NEXT