Ladki Bahin Yojana SAAM TV
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ? मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख जणांनी नोंदणी केली आहे. 15 ऑक्टोबर ही नोंदणीसाठी शेवटची तारीख होती.

Girish Nikam

महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख जणांनी नोंदणी केली आहे. 15 ऑक्टोबर ही नोंदणीसाठी शेवटची तारीख होती. या योजनेला मुदतवाढ देण्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. पाहूया एक रिपोर्ट. राज्यातील महिलांना आर्थिकृदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली.

ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाला ही योजना सुरु करुन सरकारनं बहिणींना ओवाळणी दिली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्टपासूनच पैसे मिळायला सुरुवात झाली होती. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला बहुमताचा आकडा पार करता आल्याची चर्चा आहे. महिलांना आतापर्यंत पाच हफ्ते देण्यात आले आहे. आता सहाव्या डिसेंबरच्या हफ्ताचं वितरण देखील सुरु झालं आहे.

बहिणींचा वर्षाचा शेवटही सरकारनं गोड केला आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतीम तारीख 15 ऑक्टोबर होती. नोंदणीसाठी मुदतवाढ द्यायची का ? याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

या योजनेत आत्तापर्यंत काय झालं ते पाहूया.

'लाडकी'ला मिळणार मुदतवाढ?

जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे 7,500 दिवाळीपूर्वी जमा केले

15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी

त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले

पुणे, पिंपरीसह राज्यातील अनेक ठिकाणी हजारो अर्ज बाद

डिसेंबरचा हफ्ता मिळण्यास सुरुवात

2 कोटी 34 लाख महिलांना लाभ

आधार लिंक झालेल्या 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हफ्त्याचे वितरण

नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार

राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तिजोरी रिकामी आहे. असं असताना महायुती सरकारनं लाडकीसाठी साडेतीन हजार कोटींची तरतूद केली आहे. नवीन वर्षात 1500 रुपयांवरुन 2100 रुपयांचा हप्ता देताना सरकारची कसरत होणार आहे. अशा स्थितीत योजनेचा लाभ न घेतलेल्या लाडक्या बहिणींना नोंदणी करण्याची संधी मिळणार का?याकडं राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT