Bogus Ladki Bahin Yojana Beneficiaries google
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: बोगस लाडकींवर गुन्हे दाखल होणार; फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Bogus Ladki Bahin Yojana Beneficiaries: लाडकी योजनेत नियमबाह्य लाभ घेत असाल तर सावधान. सरकार बनावट लाभार्थ्यांविरोधात कडक पाऊल उचलणार असूनत्याच्याविरोधात गुन्हे दाखल करणार आहे.

Vinod Patil

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी.जर तुम्ही लाडकी योजनेत नियमबाह्य लाभ घेत असाल तर तुमच्यावर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. कोणत्या मंत्र्यांनी हा इशारा दिलाय आणि किती लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या बोगस लाडक्या बहिणींची आता खैर नाही. कारण ज्यांनी नियम डावलून लाडकीचे पैसे लाटले आहेत अशा बोगस लाडक्या बहिणींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. आणि असा इशारा दुसरा तिसरा कुणी नव्हे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलाय.

लातूर जिल्ह्यातमध्ये पाच लाख ९२ हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता. त्यातल्या तब्बल 25 हजार 136 लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद झाले आहेत.. त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे अशाच बोगस लाडक्या बहिणींवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय. तसंच फसवणूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय. नेमकं त्या काय म्हटल्या आहेत ते पाहूयात

बोगस लाडकींवर फौजदारी कारवाई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

राज्यात तब्बल ३० लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याचं सांगितलं जातंय. काही परराज्यातल्या महिलांनीही पैसे लाटल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर तिजोरीवर मोठा ताण आलाय. त्यामुळे सरकारनं या योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावलीय. त्यामुळे बहिणींनो तुम्ही नियमात बसत नसाल तर या योजनेचा स्वत:हून लाभ सोडा...अन्यथा तुमच्यावरही गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT