Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Ladki Bahin Yojana update : लाडकीचे लाड पुरवणं आता सरकारला परवडत नाहीय. त्यामुळे विधानसभेत मंत्री आदिती तटकरेंनी लाडकीला बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. मंत्री आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

सरकारी कर्मचारी असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद केल्यानंतर आता सरकारनं आणखी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना 40 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज देण्याची घोषणा केली होती.

मात्र लाडकींसाठी कर्जाची अशी कोणतीही योजना नाही, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय...

योजना नेमकी काय होती? ते पाहूयात..

लाडकीसाठी काय होती कर्ज योजना?

जिल्हा बँकेकडून लाडकीला कर्ज देण्याची अजित पवारांची होती घोषणा

व्यवसायासाठी एकरकमी 40 हजार दिले जाणार होते

कर्जाचे हप्ते 1500 रुपयांमधून कापून घेणार होते

लाडकीला स्वावलंबी बनवण्यासाठी होती कर्जाची योजना

आदिती तटकरेंच्या माहितीमुळे लाडक्या बहिणींसाठी कर्जाची कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महायुती सरकारने 2025-26 साठी 36 हजार कोटींची तरतूद केली आहे. मात्र लाडकीमुळे इतर विभागाच्या विकास कामांना कात्री लावली जात असल्याचा आरोप थेट सत्ताधारी मंत्र्यांनीच केला होता. अशात तिजोरी रिकामी असतानाही अर्थमंत्र्यांनी लाडकीसाठी केलेल्या कर्जाची घोषणा त्यांच्या सहकारी मंत्र्यांनीच फोल ठरवलीय. आता लाडकीचे लाड सरकारलाही परवडत नाहीय, हेच यातून स्पष्ट होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT