Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana The Indian Express
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: हजारो लाडक्या बहिणींचं नाव गायब; पिंपरीत हजारो महिलांचे अर्ज नामंजूर, काय आहे कारण?

Pimpri Chichwad Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक महिलाना मिळाला हवं होतं, मात्र एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 42 हजार 486 महिला ह्या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

Girish Nikam

महायुतीच्या अभूतपूर्व विजयामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरु केलेली ही योजना गेम चेंजर ठरली आहे. दरमहा 1500 रुपये लाभार्थी महिलेला दिले जात आहेत. आता त्यामध्ये 2100 रुपये वाढ करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलं आहे. तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

मात्र अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींची नाराजी समोर येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हजारो महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. अर्थात प्रशासनानं योजनेचे काटेकोर निकष लावल्यानं अर्ज नांमजूर झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन झालेलं महायुती सरकार पिंपरी-चिंचवड शहरातील आपल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून देणार का ? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नेमकी आकडेवारी पाहूया

हजारो लाडक्या बहिणींचं नाव गायब

- 4 लाख 32 हजार 890 महिलांचा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज

- 42 हजार 486 महिलांचे अर्ज नामंजूर

- अपुरे कागदपत्रं, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न, एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांचा अर्ज

अशा काही कारणांमुळे महिला योजनेपासून वंचित झाले आहेत. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. मात्र तरीही सरकार ही मोठा आर्थिक डोलारा असलेली योजना राबवण्यासाठी प्रयत्नशिल आहे. पिंपरीसारख्याच अनेक ठिकाणी अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे नव्या निकषांमुळे राज्यभरातून अजून किती लाडक्या बहिणींचं नाव गायब होणार याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT