Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'दे धक्का'; अंगणवाडी सेविकांकडून छाननी सुरू, लाखो अर्ज बाद होणार?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची निकषांनुसार छाननी सुरू झाली आहे. अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करून घेतली जात आहे. यामुळे आता कोणत्या लाडकींची नावं बाद होणार आहेत? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषांनुसार छाननी सुरू झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात चारचाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळलं आहे. मात्र अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करून घेतली जात आहे.

पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे 75 हजार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी किंवा तिच्या कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी असल्यास त्यांना मिळणारा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आता निकषांत न बसणाऱ्या लाडक्या बहिणी स्वत:हून लाभ सोडत आहेत.

लाभ सोडायचा असेल तर कुठे संपर्क कराल ते पाहूया

लाभ सोडण्यासाठी अर्ज कुठे करणार?

लाडकी बहिण योजनेचा लाभ सोडायचा असेल तर लेखी अर्ज करावा लागणार

योजनेचा स्वत:हून लाभ सोडत असल्याचं लिहून द्यावं लागणार

तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज करु शकता

जिल्हाच्या ठिकाणी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयामध्येही अर्ज करता येणार

स्वत:हून योजना नाकारलेले अर्ज लॉग-ईन करुन वगळण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

इतरही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या पाच लाख लाडक्या बहिणी यापूर्वीच अपात्र ठरल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही. दिलेली रक्कम परत घेणे उचित नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र या अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारी तिजोरीतील तब्बल 450 कोटींचा चुराडा झालाय. हीच पडताळणी सुरुवातीलाच काटेकोरपणे केली असती तर सरकारचे पैसे वाचले असते. आणि ते इतर योजनांसाठी कामी आले असते. मात्र कुणालाही सरकारी तिजोरीची नव्हे तर निवडणुकीची चिंता होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT