Ladki Bahin Yojana news Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकीला ₹२१०० बजेटनंतर मिळणार का? आदिती तटकरेंच्या उत्तराने संभ्रम वाढला

Aditi Tatkare : महायुती सरकार २१०० रूपये लाडक्या बहि‍णींना देणार आहे, पण यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होणार नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. १० मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana News Update : राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदत १५०० रूपयांवरून २१०० रूपये कधी होणार? याबाबत राजकीय आणि सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने लाडकीला २१०० रूपये देऊ, असे अश्वासन दिले होते. याबाबत महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी (Women and child welfare minister Aditi Tatkare) दिलेल्या उत्तराने मात्र संभ्रम वाढला आहे. महायुती सरकार २१०० रूपये लाडक्या बहि‍णींना देणार आहे, पण यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा होणार नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतची बातमी दिली आहे.

राज्यातील लाडक्या बहि‍णींना २१०० रूपये यंदाच्या अर्थसंकल्पात मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत आदिती तटकरे यांनी दिले आहेत. १० मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदत २१०० रूपये होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या वक्तव्यानंतर संभ्रम वाढला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शिंदेंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची आर्थिक मदत १५०० रूपयांवरून २१०० रूपये करू, असे अश्वासन दिले होते. विधानसभेला महायुतीला भरघोस यश मिळाले. सत्ता स्थापन केल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य केले होते. आगामी अर्थसंकल्पावेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रूपये कऱण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला २,१०० रुपये देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते. या आश्वासनांची आम्ही पूर्तता करणार आहोत, यात कोणतीही शंका नाही. २१०० रुपयांबाबत नियोजन सुरू आहे, पण यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० रूपये देऊ असे आम्ही म्हणालोच नव्हतो. आम्ही आमच्या घोषणेचे नक्कीच पालन करणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत कोणताही बदल केला नाही, असे आदिती तटकरे यांनमी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं - सुप्रिया सुळे

Famous Actress : ऑडिशनदरम्यान प्रायव्हेट व्हिडीओ बनवला, अडल्ट साइटवर टाकून..., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

आयपीएल स्पर्धेत मोठा ट्विस्ट; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकलं

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट; सरकारी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाची मागणी; वाचा सविस्तर

Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT