kunal kamra  Saam tv
महाराष्ट्र

'जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए..', कुणालच्या 'त्या' गाण्यावर शिवसैनिक आक्रमक, तोडला सेट; ११ जण ताब्यात

Mumbai Police Arrests in Kunal Kamra Case: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या सेटची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात आली. त्यानंतर पोलिसांची ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ११ जणांना ताब्यात घेतलं आहे.

Bhagyashree Kamble

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं सादर केलं. हे गाणं त्याला चांगलंच भोवलं. गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसैनिकांची माथी भडकली. त्यांनी कुणालच्या खार येथील सेटची तोडफोड केली. तसेच कामराला इशाराही दिला आहे.

कुणाल कामराच्या सेटवर धुडगूस घातल्यानंतर पोलिसांकडून ४० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल कनालला याला ताब्यात घेतलं असून, आणखी ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मकता गाणं सादर केल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांची आगपाखड झाली. शिवसैनिकांची माथी भडकल्यानंतर त्यांनी थेट कुणाल कामराचं सेट गाठलं आणि त्याची तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच राहुल कनाल याला तोडफोडप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आता पोलिसांनी या प्रकरणी ११ जणांना अटक केली आहे. कुणालच्या खारमधील स्टुडिओची तोडफोडीनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शिवसैनिकांच्या पदधिकाऱ्यांनी स्टुडिओमधील प्रत्येक सामान तोडलं आहे. काचा, लाईट्स, फोटो फ्रेम्स, खुर्च्या यात लाख रूपयांचं नुकसान झालं असावं. या प्रकरणी आता पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतलं आहे.

कुणाल कामराचं वादग्रस्त गाणं

ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी; आँखो पे चष्मा... हाये

ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी; आँखो पे चष्मा... हाये

एक झलक दिखलाए कभी; गुवाहाटी में छिप जाये

मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए..

ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी; आँखो पे चष्मा... हाये...

मंत्री नहीं वो दलबदलू है; और कहा क्या जाये..?

जिस थाली में खाए; उसमें ही वो छेद कर जाए..

मंत्रालय से ज्यादा, फडणवीस की गोदी में मिल जाए..

तीर कमान मिला है इसको; बाप मेरा ये चाहे..

ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी आँखो पे चष्मा;..आए हाये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT