Kunal Kamra Saam
महाराष्ट्र

Kunal Kamra On CM: 'जैसे संसद में हो एक जहरीला सांप..'कुणाल कामरानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही रचलं गाणं.. VIDEO व्हायरल

Kunal Kamra on Devendra Fadnavis: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. आता कुणालचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून टीका करणं चांगलंच भोवलंय. कुणालने एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीका केली. त्यानंतर शिवसैनिकांनी कुणालच्या सेटची तोडफोड केली. पोलिसांनी ४० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ११ जणांना ताब्यात घेतलंय. उपमुख्यमंत्री यांच्यावर गाणं सादर केल्यानंतर कुणालचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकात्मक गाणं सादर केलंय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता एक गाणं तयार केलं आहे. गाण्यातून त्याने मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

कुणाल कामराचं मुख्यमंत्री फडणवीसांवरील गाणं जसंच्या तसं..(VIDEO)

मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा,

जैसे जलता गुजरात, जैसे मनीपूर में रात.

जैसे नफरत की बात, जैसे बांटे हो नोट.

जैसे छिने हो व्होट, जैसे मन में हो खोट.

जैसे व्होट लेके हमसे वादे भूल गया..

मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा,

जैसे काला हो मन, जैसा लूटा हो धन.

जैसे भगवा हो रंग, जैसे मन में हो संघ.

जैसे पार्टी में कलेश, जैसे बेचा हो देश.

जैसे संसद में हो एक जहरीला सांप..

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठा इशारा दिला आहे.

'स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा प्रकारे खालच्या स्थराची कॉमेडी करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे चुकीचं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT